मनसेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून टाळेबंदी मध्ये शिथिलथा आणण्याची मागणी केली आहे. टाळेबंदी मुळे कापड बाजार तसेच शहरामधील छोटे मोठे व्यापारी व कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे त्यांनी पत्राद्वारे दाखवून दिले.तसेच त्यांनी मनसे मार्फत प्रशासनाला काही सूचना देखील केल्या आहेत.
सर्व व्यापारी व दुकानदारांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकान उघडण्याची परवानगी मिळावी तसेच सलून व छोटे व्यावसायिक यांनाही सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत व्यवसायासाठी परवानगी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मनसे पक्ष सर्व व्यावसायिकांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. आता प्रशासन याबाबत किती गांभीर्याने विचार करते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.