मुंबई- राज्याच्या राजकारणात आमदार महादेव जानकर यांचे स्थान महत्वाचे आहे. कांशीरामजी यांच्या विचाराने प्रेरित होऊन हा माणूस राजकारणात आला. पुढे स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्याने राजकारणाचे धडे घेतले. गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या मागे जानकर पूर्णतः पाठीशी उभे राहिले. राजकारण करत असताना धनगर समाजासाठी हा माणूस लढत आहे. त्यांच्या मागे धनगर समाज मोठ्या प्रमाणात एकवटलेला आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनीही जानकर यांनी जवळ केले.इतकेच नाही तर त्यांना आपला भाऊ देखील मानले. बऱ्याच वेळा व्यासपीठावरील भाषणात जानकर म्हणतात की, ” ताई जोपर्यंत हा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे,तोपर्यंत तू काळजी करू नको ” या बहीण भावाचं नात संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
मात्र मागील महिन्यात आमदार जानकर यांच्या आईचे निधन झाले.निधन झाल्यापासून आ.जानकर त्यांच्या राहत्या घरी (पळसावडे,ता.मान, जि. सातारा) आहेत. राज्यांमधून विविध पक्षांच्या महत्वाच्या व्यक्तींनी आ.जानकर यांनी सांत्वनपर भेट घेतली.पण जाणकारांनी ज्यांना प्रेमाने बहीण मानलं,त्या पंकजाताई अजूनही जाणकारांच्या भेटीला गेल्या नाहीत. याबाबत रासप च्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. काही रासप पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडे यांना फोन करून सरळ सरळ जाबच विचारला. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी कोरोना चे कारण देत,जाणे टाळले आहे,असे उत्तर दिले.जानकर तसे समजदार नेते आहेत.त्यामुळे इतक्या लहान सहान गोष्टीवरून ते नाराज होणार नाहीत,असाही विश्वास काही रासप पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.