नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी (ता. २५ ) कोरोनाच्या रुग्णसंख्येने तेराशेचा आकडा पार केला. जिल्ह्यात एकू १३३८ रुग्णांची नोंद झाली. त्यात नगर शहरातील ४५७ रुग्णांचा समावेश आहे. नगर पाठोपाठ संगमनेर शहराचा क्रमांक आहे. आरोग्य यंत्रणेने गुरुवारी दुपारपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. त्यात नगर शहर ः 457, संगमनेर – 148, राहाता -140 आणि कोपरगाव तालुक्यातील 101 कोरोना रुग्णांचा समावेश आहे. तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढाील प्रमाणे ःनगर शहर (महानगर पालिकेचे कार्यक्षेत्र) 457, संगमनेर 148, राहाता 140, कोपरगाव 101, अकोले 74, शेवगाव 71, श्रीरामपूर 69, नगर ग्रामीण 51, पारनेर 46, जामखेड 37, पाथर्डी 30, राहुरी 26, नेवासे 24, श्रीगोंदे 19, कर्जत 15, इतर जिल्हे 16, कॅन्टोंमेंट बोर्ड 14.