पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक सतीश मगर यांची बांधकाम व्यावसायिकांच्या देश पातळीवरील क्रेडाई राष्ट्रीयचे चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे. पुण्यातील आणखी एक बांधकाम व्यावसायिक शांतीलाल कटारिया यांची क्रेडाई राष्ट्रीयच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सतीश मगर हे नगर जामखेड मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ. रोहित पवार यांचे सासरे आहेत. क्रेडाई अर्थात काँफीडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोचे काही सदस्य आणि पदाधिकारी आता राष्ट्रीय स्तरावरील काही समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. यामध्ये सुहास मर्चंट (आकडेवारी आणि मानके), जे. पी. श्रॉफ (कौशल्य विकास) मनीष कनेरिया (पर्यावरण), आय. पी. इनामदार (कायदेशीर बाबी) या समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील तर कपिल गांधी (जनसंपर्क आणि प्रसिद्धी) समितीचे सह-अध्यक्ष म्हणून काम करतील.या विषयी बोलताना शांतीलाल कटारिया म्हणले, ” क्रेडाई पुणे मेट्रो आणि महाराष्ट्रचे पदाधिकारी इतक्या मोठ्या प्रमाणात यापुढे क्रेडाई राष्ट्रीय साठी काम करणार आहेत ही महाराष्ट्रसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या याआधीच्या जवाबदाऱ्या अत्यंत चोखपणे पार पाडल्या आहेत ही बाब अधोरेखित होते. मला खात्री आहे कि यापुढेही हे सर्व पदाधिकारी क्रेडाई राष्ट्रीय साठी काम करताना नवे मापदंड प्रस्थपित करतील.”
महाराष्ट्रातील महत्वाच्या राजकीय आणि इतर घडामोडी लगेच आपल्या व्हाट्स अप ला मिळवण्यासाठी ” न्यूज लाईन ” या डिजिटल मीडियाला जॉईन व्हा…..जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा….
http://www.join.newsline.media