जकार्ता: इंडोनेशियाच्या एका गावातील काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोत गावातील रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहत असल्याचे दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. अखेर थोड्या वेळाने या फोटोमागील सत्य समोर आले.
ट्विटरवर हजारो लोकांनी सेंट्रल जावाच्या पेकलोंगन शहरातील एका गावाचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. अनेकांनी त्याला हे रक्त दिसत असल्याचे सांगितले. मात्र, हा रंग एका डाईंग कारखान्यातील लाल रंग पाण्यात मिसळला गेला. पावसामुळे हा रंग आणखी फिक्कट झाला असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. पेंकलोंगन शहर हे पारंपरिक पद्धतीने रंगासाठी वापरण्यात येणाऱ्या डाईंग तंत्रात वापरण्यात येणाऱ्या बाटीक उत्पादनासाठी ओळखले जाते. यामध्ये कपड्यांवर पॅटर्न बनवले जाते.