नवीपेठेतील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावा ; नागरिकांचे पालिका प्रशासनाला साकडे


न्यूज लाईन नेटवर्क

पाथर्डी : मुख्य शहरात व अष्टवाडा भागात जाण्यासाठीच्या मुख्य मार्गावर सुवर्णयुग गणपती मंदिरासमोर व  ओपन

थेटर समोर अस्ताव्यस्त पार्किंग  होत असल्याने नवी पेठेतील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. या

अस्तवस्त पार्किंगची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन करू अशी भूमिका नवी पेठ येथील नागरिकांनी पालिका

प्रशासनाकडे निवेदन देऊन मांडले आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अष्टवाडा विभागात जाण्याच्या मुख्य

मार्गात सुवर्णयुग गणपती मंदिरासमोर अस्त-व्यस्त टु-व्हीलर व फोर-व्हीलर पार्किंग होत असते.त्यामुळे

अष्टवाडा,सिनेमागल्ली,लकरगल्ली,कासारगल्ली, व कासबापेठ मधील नागरिकांना घरी जाण्याच्या मार्गात अस्त-व्यस्त

टु-व्हीलर व फोर-व्हीलर ची  पार्किंग केली जाते.त्यामुळे परिसरातील नागरिक व पेठेतील व्यापारी या पार्कींगला त्रस्त

झालेला आहे.यामुळे इथली पार्किंग ची सुविधा करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
   निवेदन देण्यासाठी आतिश निऱ्हाळी, प्रदीप नि-हाळी, संतोष वराडे, विष्णुपंत आबा चिंतामणी, महेश बदडे, संतोष

कुलट, उमेश खटावकर, ओम भालसिंग, विशाल नि-हाळी, गणेश गर्जे, प्रताप नि-हाळी, अक्षय वराडे, आतिष नि-हाळी,

प्रतीक वराडे,आकाश नि-हाळी, आकाश भतोडे, सिद्धराज खोजे, नितीश नि-हाळी, रोनीत चिलवंत, ओम बदडे व सर्व मित्र

मंडळ उपस्थित होते.