धक्कादायक… १० मिनिटांतच दोन क्रिकेटपटू मैदानात कोसळले, ते थेट हॉस्पिटलमध्येच दाखल झाले

न्यूज लाईन नेटवर्क

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात एक धक्कादायक गोष्ट शुक्रवारी पहायला मिळाली. कारण शुक्रवारी फक्त १० मिनिटांमध्येच दोन क्रिकेटपटू मैदानात कोसळल्याचे पहायला मिळाले. या दोघांचीही प्रकृती एवढी गंभीर होती की, त्यांना थेट हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात आले.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या महिलांची ट्वेन्टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील एक सामना शुक्रवारी सुरू झाला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत होता. त्यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाबरोबर ही दुर्दैवी घटना घडली. या सामन्यात फक्त १० मिनिटांत वेस्ट इंडिजच्या दोन खेळाडूंची प्रकृती बिघडली. या दोन्ही खेळाडूंची प्रकृती एवढी बिघडली की त्यांना मैदान सोडताना चालताही येत नव्हते. त्यामुळे त्यांच्यासाठी स्ट्रेचर मागवावे लागले आणि त्यांना थेट हॉस्पिटलमध्येच दाखल करावे लागले. वेस्ट इंडीजच्या या दोन खेळाडूंची नावे आलिया एलिन आणि चेडियन नेशन अशी आहेत. या दोघींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण या दोघींबाबत अजून कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.